जळगाव । महापालिका मालकीच्या जुनी साने गुरूजी रूग्णालय परिसरात असलेल्या धर्मशाळा मार्केटमधील दोन गळ्यांना खाजगी व्यक्तींनी कुलूप लावले आढळून आले. जुने साने गुरूजी वाचनालयाच्या ओपन स्पेसमध्ये पार्कींगची व्यवस्था करण्यात येत आहे. पार्कींगची व्यवस्था करतांना मक्तेदारांची माणसे या जागेस जाळी लावण्याचे काम करीत होते. हे काम करीत असतांना त्यांना धर्मशाळा मार्केटमधील दोन गाळे कुलूप बंद दिसून आले. यात एका गाळ्यातून दारूचा वास येत असल्याचे तेथे कामकरणार्या मक्तेदाराच्या माणसांच्या लक्षात आले. यावेळी मक्तेदाराच्या माणसांनी आयुक्त चंद्रकांत डांगे यांच्याशी संपर्कसाधून ही बाब निदर्शनास आणून दिली. आयुक्तांनी तत्काळ तेथे हजर होत दोन्ही गाळ्यांचे कुलूप तोडण्याचे आदेश देऊन गाळ्यांमधील माल जप्त केला.
दरवाजा तोडून सामान जप्त
आयुक्त डांगे धर्मशाळा मार्केट पहाणी करत असतांना अनाधिकृतरित्या दोन गाळ्यांना कुलूप लावलेले होते असे निदर्शनास आले. दोघ गाळ्यांचे कुलूप तोडण्याचे आदेश यावेळी आयुक्त डांगे यांनी दिले. अतिक्रमण निर्मुलन पथकातील कर्मचार्यांनी दरवाजा तोडून गाळ्यांमध्ये प्रवेश केला. यावेळी एका गाळ्यात एक गॅस सिलेंडर, भाजीपाला ठेवण्याचे कॅरेट जप्त करण्यात आले. तर दुसर्या गाळ्यातून रिकाम्या दारूच्या बाटल्या व इतर साहित्य जमा करण्यात आले.
उपाययोजना करण्याचे आदेश
यावेळी आयुक्त डांगे यांनी या ठिकाणी गंभीर स्वरूपाच्या घटना घडण्याची शक्यता लक्षात घेता अधिकार्यांना अशा स्वरूपाच्या घटना घडू नये याबाबत उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. आयुक्त डांगे यांनी धर्मशाळा मार्केटच्या दोन्ही मजल्याची पहाणी केली. या पहाणीत त्यांना रिक्त गाळ्यांना दरवाजा नसल्याने येथे असमाजीक तत्व फायदा घेऊ शकत असल्याने या इमारतीचे ऑडीट करून या इमारतीला असामाजिक तत्व उपयोग करू शकणार नसणार नाही त्या संबंधीच्या सूचना अधिकार्यांना आयुक्तांनी तत्काळ दिल्या.
खाजगी व्यक्तींचे कुलूप
मक्तेदाराच्या माणसाने संपर्क साधल्यानंतर आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी तत्काळ धर्मशाळा मार्केटला भेट दिली. यावेळी आयुक्तांना दोन खोल्यांना खाजगी व्यक्तींनी कुलूप लावले असल्याचे दिसून आले. यावेळी त्यांच्यासोबत उपआयुक्त लक्ष्मीकांत कहार, अतिक्रमण अधिक्षक एच. एम. खान, बांधकाम अधिक्षक सुनील भोळे, किरकोळ वसुली विभागाचे नरेंद्र चौधरी आदी उपस्थित होते. संबधित जागेवर साफसफाईच्या वेळी मक्तेदाराच्या माणसाने सर्तकता दाखवून ही खबर आयुक्तांना दिल्याने यादोघ गाळ्यांवर कारवाई करण्यात आली.
महापालिकेच्या मालमत्तेत्त अनाधिकृत व्यवसाय करत असेल त्यावर 100 टक्के कारवाई करण्यात येणार. धर्मशाळा मार्केटमधील रिक्त गाळ्यांचा ऑडीट करून त्यांची स्ट्रक्चरल व स्टॅबीलीटी तपासून पुर्नवापर होवू शकतो का याबाबत रिपोर्ट मागविणार. ही इमारत वापरा योग्य असल्याचा रिपोर्टं आल्यास या इमारतीचा व्यवसायीक वापर होवून त्यातून महापालिकेला आर्थिक उत्पन्न मिळण्यास मदत होईल.
– चंद्रकांत डांगे, आयुक्त, महानगरपालिका, जळगाव