जळगाव : समाजवादी पार्टी, तर्फे मंत्रालयात जाऊन आत्महत्या करणारे शेतकरी धर्मा पाटील यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. शोक सभेस विविध पक्षाचे व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष राधे:श्याम चौधरी, बहुजन क्रांती मोर्चाचे मुकुंद सपकाळे, मराठा सेवा संघाचे सुरेंद्र पाटील, सुरेश पाटील, राम पवार, शेतकरी सुकाणु समितीचे सचिन धांडे, संभाजी ब्रिगेडचे खुशाल चव्हाण, शैलेश पाटील, सलीम इनामदार, अमजद पठाण, रैयान जहागीरदार इ. शोकसभेत उपस्थित होते.
यांची होती उपस्थिती
वृध्द शेतकर्यांचे मंत्रालयात जाऊन आत्महत्त्या करावी हे पुरोगामी महाराष्ट्रासाठी कलंक आहे. ऊर्जा प्रकल्पासाठी अधीग्रहीत जमीन मोबदल्यात राज्यमंत्री जयकुमार रावल यांच्या भुमिकेची चौकशी केली जावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. याप्रसंगी सपाचे जिल्हाध्यक्ष रागीब अहमद, उपाध्यक्ष रफियोद्दीन खान, महानगराध्यक्ष मीर नाझीम अली, सचिव रईस बागवान, युवराज सभा जिल्हाध्यक्ष सैय्यद दाणीश, महानगरउपाध्यक्ष फहीम पटेल, युवाजन सभा महानगराध्यक्ष शाहीद शेख, कोरकमेटी चेअरमन अहमद शेख तसेच कासीम उमर, फरहान खान, अलताफ शेख, शोऐब शेख, जकी पटेल, दानीश शेख, इद्रीस मन्यार, अजहर शेख कोअर कमेटी चेअरमन अहमदसर आदी उपस्थित होते.