धाक दाखवून तरुणाची दुचाकी लंपास

0

पिंपरी : पिस्टलचा धाक दाखवून तीघांनी एका तरुणाची दुचाकी चोरली आहे. ही घटना शनिवारी (दि.11) सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास इंद्रायणीनगर येथे घडली. याप्रकऱणी निलेश दिलीप भागवत (वय 24 रा. ज्ञानेश्‍वर कॉलनी, आकुर्डी) व त्याचे दोन साथीदार यांच्यावर भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. निलेश पवार (वय 25 रा, खराळवाडी, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इंद्रायणीनगर येथील स्केटींग ग्राउंडवर फिर्यादी पवार आपल्या भावासोबत ग्राऊंडचे काम करत होते. यावेळी आरोपी भागवत याने दोघांना पिस्टल दाखवून त्यांच्याकडील दुचाकी (एम.एच 14 जी बी 3161) पळवून नेली. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाम्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस याचा तपास करत आहेत.