धाडसत्र : 50 हजारांच्या मद्यासह दुचाकीही जप्त

0

भुसावळ । शहरातील आगवाली चाळ भागात सट्टा जुगार तर गोलाणी कॉम्प्लेक्स तसेच गोजोर्‍यातून 16 हजार 282 रुपयांची देशी-विदेशी दारू तर विनापरवाना दारूची वाहतूक करताना दोघांना अटक झाली.

सट्टा-जुगार्‍यांसह बेकायदा मद्यविक्रेते अटकेत
आगवाली चाळ भागात मोहम्मद लतीफ मोहम्मद मैकन यास झेडटीसी रोडवर रेल्वे पीओएचसमोर सट्टा खेळताना पकडण्यात आले. तीन हजार 150 रोख रुपये व सट्टा जुगाराची साधने जप्त झाली. गोलाणी कॉम्पलेक्स भागात साई मंदिराच्या मागे सुनील शिवराम पाटील हा बेकायदा देशी-विदेशीची विक्री करीत असल्याने त्याच्याकडून सात हजार 440 रुपयांचा माल ताब्यात घेण्यात आला तसेच गोजोरा गावात भगवान विश्राम कोळी यास बस स्टँडजवळून ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून एक हजार 132 रुपयांचा माल ताब्यात घेण्यात आला.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर 31 रोजी दुपारी शरद वसंत चौधरी (शनी मंदिर वॉर्ड) व राहुल दत्तु चौधरी (गंगाराम प्लॉट) हे बेकायदा दारूची वाहतूक करीत असल्याने त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून 25 हजार रुपये किंमतीची दुचाकी (एम.एच.19 -8212) व 9 हजार 984 रुपयांचे बेकायदा मद्यसाठा जप्त करण्यात आला. साकेगाव येथे नदीपात्रात सायंकाळी विशेष पथकाने 20 हजार रुपये किंमतीची गावठी दारू नष्ट केली. आरोपी मात्र कुणीही मिळून आला नसल्याचे सांगण्यात आले.

विशेष ईआरटी पथकाची कारवाई
सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली ईआरटी पथकातील पोलीस उपनिरीक्षक अंगत नेमाणे, पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र साळुखे, पोलीस नाईक बंटी सैंदाणे, सुनील थोरात, साहील तडवी, इशत्याक सैय्यद, पोलीस कॉन्स्टेबल कृष्णा देशमुख, निलेश बाविस्कर, दिपक जाधव, प्रदिप इंगळे, सोपान पाटील यांनी कारवाई केली.