धानोरा आश्रमशाळेत आदीवासी दिन साजरा

0

धानोरा- जागतिक आदिवासी दिनानिमित्त मैशाल फाउंडेशन संचालित आदिवासी आश्रम शाळेत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संस्थेचे चेअरमन तथा माजी पोलिस उपअधिक्षक दिलीप सूर्यवंशी, उपाध्यक्ष बी.एस.महाजन, संस्थेचे समन्वयक समीर भोरटक्के, यावल पंचायत समितीच्या सभापती पल्लवी चौधरी, डांभुर्णी सरपंच पुरुज्जीत चौधरी, प्राथमिक मुख्याध्यापिका वंदना वळवी, माध्यमिक मुख्याध्यापक के.एम.वाघ आदी उपस्थित होते.

यावेळी चेअरमन सूर्यवंशी यांनी आदिवासी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. दरम्यान विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. प्रास्ताविक, सूत्रसंचालन निता सुरवाडे, आभार गोविंदा चौधरी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

कार्यक्रम प्रसंगी चेअरमन दिलीप सूर्यवंशी यांनी आदिवासी पालकांचा सत्कार केला. आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी महापुरुषांची वेशभूषा साकारली होती.