धानोरा विद्यालयाच्या चेअरमनपदी सुकदेव पाटील

0

धानोरा । येथील महाजन माध्यमिक व पाटील ज्युनिअर कॉलेजच्या चेअरमनपदी भुसावळ येथील मे जव्हार डेअरी व जोहार पॅलेस हॉटेलचे मालक सुखदेव पाटील यांची चेअरमनपदी निवड करण्यात आली. तर भुसावळ हायस्कूल भुसावळचे वरिष्ठ लिपिक सागर चौधरी यांनीही सुकदेव पाटिल यांचा विद्यालयाच्या शालेय समितीच्या सदस्यपदी माजी चेअरमन चुडामण पाटील, बी.एस.महाजन, प्रदीप महाजन, वामनराव महाजन यांची निवड करण्यात आली.

या सत्कार समारंभाप्रसंगी विद्यमान चेअरमन सुखदेव पाटील, माजी चेअरमन चुडामण पातिल, आश्रमशाळेचे चेअरमन बी.एस.महाजन सतपंथ जोत मंदिराचे अध्यक्ष बाजीराव पाटील, प्राचार्य के.एन.जमादार, उपमुख्याध्यापक ए.एम.पाटील, पर्यवेक्षक बी.डी.पाटील, जगदीश पाटील, राजेंद्र चौधरी, दिनेश परमार, शेखर पाटील, योगेश पाटिल, ए.पी.खैरनार, एल.डी.पाटिल, के.पी.बडगुजर, वासुदेव महाजन, देविदास माहाजन, प्रा.रेखा महाजन, पुनम पाटील यांच्यासह सर्व शिक्षक वसुलीचे केटर कर्मचारी उपस्थित होते. सुत्रसंचलन आभार एम.सी.बडगुजर यांनी मानले.