धानोर्‍यात चोरट्यांचा 7 लाखांवर डल्ला

0

धानोरा । धानोरा कापसाचे व्यवसाय करणार्‍या व्यापार्‍याच्या घरातून तब्बल 7 लाखांची रोकड अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याची घटना शुक्रवार 22 डिसेंबर रोजी सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास घडली. सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार धानोरा येथील कापूस खरेदी विक्री करणारे व्यावसायीक गणेश शंकरलाल व्यास यांनी कापूस विकून शेतकर्‍यांचे पेमेंट देण्यासाठी 7 लाखांची रोकड घरात आणून पलंगावरच ठेवली. नंतर कामात व्यस्त असतांना अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून सदरील रोकडे लंपास केले. चोरीची घटना घडल्यानंतर गणेश व्यास यांनी अडावद पोलिसात धाव घेतली आहे. दरम्यान व्यास यांच्या घराच्या परीसरात सीसीटीव्ही लावण्यात आले असून लवकरच चोरट्याचा चेहरा समोर येणार असल्याचे बोलले जात आहे.