धानो-यात गटारी तुडूंब भरल्याने दुषित पाणीपुरवठा

0

धानोरा- येथे गेल्या महिन्यापासुन गावात विविध ठिकाणी गटारी तुडूंब भरल्या आहेत. त्यातच अनेक ठिकाणी लिकेज पाणीपुरवठा होत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे.

गावातील मुख्य चौकाला लागुन माळीवाडा रस्त्यावरील व इतर भागातील गटारी तुडूंब भरलेल्या आहेत. यात काही ठिकाणी गटारींचे पाणी रस्त्यावर वाहत आहे. तसेच डासांचा मोठ्या प्रमाणात उपद्रव झाल्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत ग्रामपंचायतने लवकरात लवकर कार्यवाही करावी अन्यथा आंदोलनाचा इशारा दिलेला आहे.
स्वच्छता मोहीम राबविणार.

संपूर्ण गावात ज्या ठिकाणी अस्वस्छता आहे तेथे स्वच्छता मोहीम राबविली जाईल.
माणिक पाटील-ग्रामसेवक

सरपंच सक्षम नाहीत
गावात विकासकामे व्हावीत यासाठी सरपंच सक्षम नाहीत. त्यांचे पतीच कारभार चालवितात. चारही बाजुंना स्वच्छता नाही.
अशोक सुकदेव-उपसरपंच

आंदोलन करणार
गल्लीत गटारी तुडूंब भरलेल्या आहेत.यामुळे डासांचा प्रादुर्भाव झालेला असल्याने आरोग्यावर परीणाम होत आहे.फवारणी आवश्यक आहे.लवकरच स्वच्छता झाली नाही तर ग्रामपंचायत समोर आंदोलन करणार.
योगेश्वरी सोनवणे-राहीवाशी