पुणे :- खेड तालुक्यात धावत्या बसमध्ये एका तरुणाची कोयत्याने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. धावत्या बसमधील प्रवाशांनी हा थरार अनुभवला. हत्या झालेल्या तरुणाचे नाव श्रीनाथ सुदाम खेसे असे असून आरोपीचे नाव अजित कान्हूरकर आहे. या घटनेनंतर एसटी चालकाने बस थेट खेड पोलीस ठाण्यात नेली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, आरोपी अजित कान्हूरकर याने श्रीनाथच्या बहिणीचे अश्लील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. आरोपीविरोधात श्रीनाथने 8 जूनला पोलिसांत तक्रारदेखील दिली होती. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. परंतु पोलिसांनी योग्य ती कारवाई केली नाही. पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे हे हत्याकांड घडल्याचा आरोप करण्यात येत आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहेत.