धावत्या रेल्वेखाली प्रौढाने संपविले जीवन

An Adult in Jalgaon committed suicide by leaning under the train Near Shirsoli Railway Station जळगाव : शहरातील हाजी अहमद नगरातील शेख इरफान शेख याकुब मणियार यांनी रेल्वेस्टेशनजवळ दुचाकी लावून धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केली. ही घटना गुरुवार, 1 रोजी सकाळी उघडकीला आली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

बांगडी व्यावसायीकाच्या आत्महत्येने हळहळ
नातवाईकांनी दिलेल्या माहितीनसार, शेख इरफान शेख याकुब मणियार हे आपल्या पत्नी व दोन मुलांसह हाजी अहमद नगर, सलार नगर जवळ जळगाव यांच्यासह वास्तव्याला होते. बांगड्यांचा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करत होते. त्यांचे सराफ बाजारातील भवानी माता मंदीराजवळ दुकान होते. त्यांची पत्नी रूखसानाबी या मुजाहिद व जयद या दोन मुलांसह नंदूरबार माहेरी कामानिमित्त दोन दिवसांपासून गेलेल्या होत्या. त्यामुळे शेख इरफान हे घरी एकटेच होते. गुरूवार, 1 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजता ते दुचाकीने शिरसोली येथील मोठी बहिण मलेकाबी यांच्याकडे गेले. सकाळी नाष्टा करून माझ्यासाठी डबा पाठवून दे असे बहिणीला सांगून घराबाहेर पडले. दरम्यान, शिरसोली रेल्वे स्थानकाजवळ त्यांनी दुचाकी लावून धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केल्याचे सकाळी 9 वाजता उघडकीला आले. आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही. घटनेची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी धाव घेवून मृतदेहाचा पंचनामा केला व मृतदेह जिल्हा शासकीय रूग्णालयात हलविण्यात आला. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

आत्महत्येचे कारण अस्पष्ट
घरात सर्व काही ठिक असतांना शेख इरफान यांनी आत्महत्या का केली असा प्रश्न नातेवाईकांकडून केले जात आहे. मयताच्या पश्चात आई फातेमाबी, पत्नी रूखसानाबी, मुजाहिद व जयद ही दोन मुले, लहान भाऊ सलिम शेख व बहिणी असा परीवार आहे.