धावत्या रेल्वेखाली वृध्दाची आत्महत्या

0

जळगाव – गेल्या काही महिन्यांपासून असलेल्या आजाराला कंटाळून हरिविठ्ठल नगरमध्ये राहणाऱ्या 60 वर्षीय वृध्दाने धावत्या रेल्वेखाली येवून आत्महत्या केल्याची घटना सकाळी 11 वाजेपुर्वी घडली असून रामानंदनगर पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, दिवाकर विठ्ठलराव देवरे (वय-60) रा. हरिविठ्ठल नगर यांना गेल्या काही महिन्यांपासून वेगवेगळे आजार जडले होते. यावर त्यांचे रूग्णालयातही उपचार सुरू होते. जडलेले आजार असह्य झाल्याने त्यांनी घरात कोणालाही न सांगता सकाळी घरातून निघून गेले. जळगाव-शिरासोली दरम्यानच्या रेल्वे खंबा क्रमांक 417/8 ते 10 दरम्यान धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केली. त्यांच्या खिश्यातील कागदपत्रांच्या आधारे त्यांची ओळख पटली. मयताच्या पश्चात चार मुले, चार सुना, नातवंडे असा परीवार आहे. जळगाव रेल्वे स्टेशनचे उपप्रबंधक स्टेशन मास्तर आर.के.पलरेचा यांच्या खबरीवरून रामानंदनगर पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील प्राथमिक तपास विश्वनाथ गायकवाड करीत आहे.