धावत्या रेल्वेतून पडल्याने भुसावळच्या युवकाचा मृत्यू

0

भुसावळ । येथील पंचशिलनगरातील युवकाचा बुर्‍हाणपूरहून येत असताना नागपूर – इटारसी – भुसावळ इंटरसिटी एक्स्प्रेसमधून पडून मृत्यू झाल्याची घटना घडली. पंचशील नगरातील रहिवासी पवन चौधरी (वय 23) हा 15 जुलै रोजी सकाळी 11 वाजता बुर्‍हाणपूर येथे प्लॉस्टीक कागद घेण्यासाठी गेला होता.

भुसावळ येथे परत येण्यासाठी तो नागपूर-भुसावळ व्हाया इटारसी इंटरसिटी एक्स्प्रेसमध्ये बसला. त्याच्यासोबत भुसावळातील काही नातेवाईक बुर्‍हाणपूर येथे साखरपुड्यासाठी गेले होते ते देखील होते, मात्र ते मागच्या डब्यात होते. बुर्‍हाणपूरपासून तीन किमी अंतरावरील बिरोदा रेल्वे गेटजवळ रेल्वे खांब्यावर पवन याचे डोके आदळल्याने तो खाली पडला आणि त्यातच तो मरण पावला.