धावत्या रेल्वेतून पडून अनोळखी इसमाचा मृत्यू

0

वरणगाव- येथून जवळच असलेल्या जाडगााव शिवसरात कोणत्यातरी धावत्या रेल्वेतून पडून वयोवृध्द अनोळखी इसमाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी 7 वाजेच्या पूर्वी घडली. 55 ते 60 वर्ष वयोगटातील अनोळखी इसम हा जाडगाव शिवारातील अप रेल्वे ट्रॅक खांबा क्रमांक 454/17 ते 454/19 चे दरम्यान रेल्वे ट्रॅक वर कोणत्यातरी धावत्या रेल्वे गाडी खाली पडून मयत झाला. वरणगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हवालदार संदी बडगे करीत आहे. अनोळखी इसमाची ओळख पटत असल्यास वरणगाव पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.