Thieves put the mobile phone stolen from Yawal College in the bus यावल : यावल शहरातील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयांमध्ये परीक्षा देण्यासाठी आलेल्या एका विद्यार्थिनीचा मोबाईल चोरी झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. धास्तावलेल्या चोरट्याने हा मोबाईल फिर्यादी विद्यार्थिनी प्रवास करीत असलेल्या बसमध्ये सोडल्याची बाब समोर आली असून चोरटा हा माहितगार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
बॅगेतून लांबवला मोबाईल
यावल शहरात फैजपूर रस्त्यावर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातत पेपर देण्याकरीता पुष्पांजली भगवान राजपूत (चुंचाळे, ता.यावल) ही विद्यार्थिनी आली असता हॉलबाहेर ठेवलेली बॅगेतून विद्यार्थिनीचा 12 हजारांचा मोबाईल चोरट्यांनी लांबवला होता. या प्रकरणी विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांकडून तपास सुरू होण्यापुर्वीच मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल झाल्याचे किंबहूना लक्षात आल्याने धास्तावलेल्या चोरट्याने विद्यार्थिनी प्रवास करीत असलेल्या यावल-चुंचाळे एसटी बसमध्ये चोरी केलेला मोबाईल ठेवत पळ काढल्याचे उघडकीस आले आहे. तपास यावल पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक किशोर परदेशी करीत आहेत.