धुणे धुण्यासाठी गेलेल्या दोघांचा मृत्यू ; टाकळीची घटना

0

चाळीसगाव- धुणे धुण्यासाठी गेलेल्या तालुक्यातील शिरसगाव येथील 32 वर्षीय महिलेसह 12 वर्षीय मुलीचा टटाकळी प्र.दे. शिवारातील के.टी.वेअर बंधारा जवळील विहिरीत पडल्याने मृत्यू झाला. 12 रोजी दुपारी 12.10 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. मेहुणबारे पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. शिरसगावच्या सोनाली सुनील रावते (32) व आशाबाई बंडु अहिरे (12) या टाकळी प्र.दे.शिवारात के.टी.वेअर बंधार्‍याजवळील एकनाथ साहेबराव पवार यांच्या विहिरीवर बुधवारी धुणे धुण्यासाठी गेल्या होत्या. दुपारी 12.10 वाजेच्या सुमारास आशाबाई अहिरे हिचा पाय घसरल्याने ती विहिरीत पडली असता तिला वाचवण्यासाठी सोनाली रावते या धावल्या पण त्यांचाही पाय घसरल्याने त्यादेखील विहिरीत पडल्या व दोघांचा बुडाल्याने मृत्यूझाला. आशाबाई बंडु अहिचे हिचे वडील बंडु शंकर अहीरे हे परीवारासह राजेंद्र रावते यांच्याकडे मेंढ्या सांभाळण्यासाठी रोजंदारीने कामाला होते व टाकळी प्र दे गावाला वाडा करुन मुक्कामी होते. या प्रकरणी मेहुणबारे पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असुन तपास हवालदार सुभाष पाटील करीत आहेत.