चाळीसगाव । येथील बसस्थानकाचे नुतनीकरण सुमारे एक- दिड वर्षापासून सुरू आहे. त्यामुळे प्रवाशांना तेथील कामाच्या धुळीने श्वसनाचे व दम्याचे आजार लागले आहेत. शाळा व कॉलेजच्या विद्यार्थी व विद्यार्थीनींना धुळीने दमाचा ञास वाढल्याचे दिसून आले आहे. याप्रकरणी दिरंगाईने काम करणारे ठेकेदारावर दंड आकारून नियमाने कारवाई करावी, अन्यथा प्रखर आंदोलन छेडण्याचा इशारा नगरसेविका रंजना यशवंतराव सोनवणे दिला आहे.
बसस्थानकाचे नुतणनिकरण त्वरीत पुर्ण करण्याची मागणी
येथील बसस्थानकावर अनेक दुकाने नियमबाह्य पद्धतीने थाटण्यात आली आहेत. या दुकानांचा जाहिर फेरलिलाव करून इतरांना न्याय मिळवून देण्यासाठी न्यायालयात लवकरच याचिका टाकू असे, नगरसेविका रंजना सोनवणे यांनी सांगितले आहे. महिलांच्या शौचालयासमोर मोठी 6 फुट भींतीचे बांधकाम करावे जेणेकरून भींतीचा आडोसा तयार होईन महिला भगिनींना सुरक्षित वाटेल. तरी वरील बाबींची पुर्तता न केल्यास व नुतनिकरण तातडीने पुर्ण न केल्यास आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे.
प्रवाश्यांचे आरोग्य धोक्यात
दरम्यान, चाळीसगाव बसस्थानक आवारात बस थांबल्या असताना काही तरुण त्याठिकाणी पावपडा, वडा पाव व ईतर खाद्यपदार्थ विनापरवाना उघड्यावर विक्री करीत असल्याने प्रवाश्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, याची चौकशी करावी, अशी बातमी 12 डिसेंबर 2017 रोजी दैनिक जनशक्तीमध्ये प्रसिद्ध केली होती. बसस्थानक आवारात अशा पद्धतीने उघड्यावर खाद्यपदार्थ विक्री करता येतात का? याबाबत 12 रोजी चाळीसगाव बस स्थानक प्रमुख तथा सहाय्यक वाहतुक अधीक्षक पी.एन.चौधरी यांच्याकडून माहिती जाणुन घेतली असता तसा परवाना त्या उघड्यावर खाद्यपदार्थ विक्री करणार्यांकडे आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.