नवापूर । तालुक्यातील धुलीपाडा येथील फोरेस्ट विभागातील वन जंगलात मंगळवारी दुपारी 3 वाजता आग लागली. या आगीत सुमारे 60 हेक्टर जमिन वरील चारा झाडे पक्षी, ससे, आगीत होरपळून राख झाले असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आगीचे वृत्त कळताच तहसिलदार प्रमोद वसावे, पुरवठा निरीक्षक मिलिंद निकम यांनी धुलीपाडा गावात तातडीने भेट दिली. त्या नंतर 3 किलो मिटर जंगलात जाऊन पायी फिरत पाहाणी केली. या नंतर तहसिलदार यांनी नगरपालिका अग्निशाम दलाला फोन केला. तेव्हा अग्निशामक बंब आल्यावर जंगलाची आग विझवली मात्र चिंचपाडा वनविभागाचे वनक्षेत्रपाल व वनपाल कोणीही या घटना स्थळी आले नव्हते. ही आग सोनखडकागावा पासुन लागली असावी असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. या आगीचे कारण उशिरा पर्यत समजु शकले नाही.
जंगल वाचविण्यासाठी ग्रामस्थांचा पुढाकार
तहसीलदार प्रमोद वसावे यांनी तातडीने येऊन अग्निशामक बंब बोलवुन आपतकालीन व्यवस्था केल्यामुळे मोठी वित्त व जीवत हानी टळली. घटनास्थळी तहसीलदार प्रमोद वसावे हे पहीले अधिकारी आहेत जे घटनास्थळी पोहचले त्यांनी ग्रामस्थ यांचा मदतीने 3 किलो मीटर पायी जाऊन पुर्ण जंगालाची पहाणी केली व ग्रामस्थांचा मदतीने आपतकालीन व्यवस्था केली व आग विझवण्यास यश मिळवले तसेच ग्रामस्थांशी पुर्ण जंगलाची माहीती घेतली आहे.