भुसावळ- धुळ्यातील अपर पोलिस अधीक्षक विवेक पानसरे यांच्या बदलीला औरगांबाद मॅटमध्ये आव्हान दिल्यानंतर स्थगिती देण्यात आली आहे. पानसरे यांनी गेल्या काही महिन्यांच्या काळातच शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवत अवैध धंद्यांवरही धडक कारवाई केल्याने शहरवासीयांमधून त्यांच्या कामाविषयी समाधान व्यक्त होत होते मात्र दोन दिवसांपूर्वीच म्हणजे 17 रोजी राज्याचे गृह विभागाचे उपसचिव कैलास गायकवाड यांनी दहा अपर अधीक्षकांसह 29 सहाय्यक पोलिस आयुक्त व पोलिस उपअधीक्षकांच्या बदलीचे आदेश काढून त्यांना तात्पुरता पदोन्नती जाहीर करण्यात आली होती. त्यात धुळे अपर पोलिस अधीक्षकपदी यवतमाळचे पोलिस उपअधीक्षक राजू एन.भुजबळ यांची बदली करण्यात आली होती मात्र या बदलीच्या आदेशाला अपर अधीक्षक पानसरे यांनी औरंगाबाद मॅटमध्ये आव्हान दिल्यानंतर न्यायालयाने बदलीस स्थगिती दिली. पानसरे यांच्या वतीने अॅड.धनंजय ठोके-पाटील व अविनाश देशमुख यांनी काम पाहिले.