धुळे जिल्हाधिकारीपदी राहुल रेखावार

0
डॉ.दिलीप पांढरपट्टे यांची बदली
धुळे- जिल्हाधिकारी डॉ.दिलीप पांढरपट्टे यांची मुंबई येथील महाराष्ट्र राज्य मत्स्य विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी बदली झाली असून त्यांच्या जागी परभणी महापालिकेचे आयुक्त राहुल रेखावार यांची बदली झाली आहे. याबाबतचे आदेश सामान्य प्रशासन विभागाचे अपर सचिव महेश झगडे यांनी काढले आहेत. रेखावार हे 2013 मध्ये हिंगोली जिल्हा परीषदेचे मुख्य अधिकारी म्हणून कार्यरत होते. 2015 मध्ये त्यांची बदली परभणी येथे मनपा आयुक्त म्हणून झाली होती.