धुळे जिल्ह्यात 21 ऑगस्टपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश

0

धुळे । आगामी सण, उत्सवांच्या पार्श्‍वभूीवर धुळे जिल्ह्यात मंगळवारपासुन ते 21 ऑगस्ट 2017 च्या रात्री 12 वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत, असे जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे .या आदेशात म्हटले आहे, जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी व परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांना मदत व्हावी, म्हणून जिल्हाधिकारी डॉ. पांढरपट्टे यांनी त्यांना मुंबई पोलिस अधिनियानुसार प्राप्त अधिकाराचा वापर करून सदर प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.

या काळात सोटे, तलवारी, बंदुका, भाले, सुरे, लाठ्या किंवा शारीरिक दुखापती करण्यासाठी वापरात येतील, अशी कोणतीही हत्यारे अथवा वस्तू बरोबर घेवून फिरण्यास प्रतिबंध केला आहे. तसेच अंग भाजून टाकणारा कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ किंवा द्रव्ये बरोबर घेवून फिरणे, दगड अगर अस्त्रे सोडावयाची अगर फेकण्याची हत्यारे, साधने इत्यादी तयार करणे, जमा करणे आणि बरोबर नेण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. याकावधीत पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे.