धुळे जि.प.अध्यक्षांना मारहाण?

0

धुळे- जिल्हा परिषद आवारातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या विटंबनेनंतर घटनास्थळी मोठा जमाव जमलेला होता. या घटनेच्या निषेधासाठी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शिवाजी दहिते हे डॉ.आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याकडे जात असतानाच जमावातील एकाने त्यांच्या कानशिलात लगावल्याचे समजते. मात्र , दहिते यांनी या घटनेचा इन्कार केला आहे. रागाच्या आणि संतापाच्या भरात गर्दीतील एकाने धक्का मारल्याचे दहिते यांनि माध्यमांना सांगितले.

घटनेचा निषेध करताना दहिते म्हणाले की,समाजकंटकांवर कडक कारवाई व्हावी, त्याचबरोबर अशा घटना पुढे घडू नये यासाठी ताबडतोब निर्णय घेवून जि.प.आवारात आणि पुतळ्यासमोरील जागांमध्ये सीसीटीव्ही लावण्यात येतील. दरम्यान, या घटनेनंतर जि.प.अध्यक्षांच्या कॅबिनबाहेर बंदोबस्त लावण्यात आला होता. पुतळा विटंबनेच्या निषेधार्थ कर्मचारी संघटनांनी आज धुळे जिल्हा परिषदेत काम बंद आंदोलन केले होत.