धुळे तालुक्यात वेगवेगळ्या घटनेत दोघांचा मृत्यू

0

धुळे- तालुक्यातील कावठी येथे विहिरीत बुडून तरुणाचा मृत्यू झाला तर दुसर्‍या घटनेत धुळे शहरात ईमारतीवरून पडल्याने एकाचा मृत्यू झाला. पहिल्या घटनेत कावठी येथे मंगळवारी सकाळी विहिरीत पडल्याने रवींद्र शंकर शिंदे (29) या तरुणाचा मृत्यू झाला. पांडुरंग जीरे यांच्या विहिरीत मृतदेह आढळून आला. याप्रकरणी प्रवीण युवराज सूर्यवंशी यांच्या माहितीवरुन सोनगीर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. दुसर्‍या घटनेत धुळे शहरातील मुंबई-आग्रा महामार्गाला लागून असलेल्या गुरूद्वारच्या मागील बाजूस नवनिर्मित बांधकाम होत असलेल्या इमारतीवरुन पडल्यामुळे एकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. गुरुद्वाराच्या मागे बांधकाम सुरू असताना आशिष आखडी भारती (22, रा.रामशास्त्रीनगर, पोस्ट बन्सी, जि.सिध्दार्थनगर, उत्तर प्रदेश) हा मजूर हा काम करीत असताना त्यास भोवळ आल्याने तो पाचव्या मजल्यावरुन खाली पडला. या घटनेत तो गंभीर जखमी झाला. त्याला अत्यवस्थ स्थितीमध्ये हिरे रुग्णालयात दाखल केले परंतु उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी धुळे शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.