धुळे – येथील जिल्हा न्यायालयात बॉम्ब ठेवल्याचे निनावी पत्र सकाळी प्राप्त झाल्याचे वृत्त आहे. या धमकी पत्राने प्रचंड खळबळ उडाली आहे. या निनावी पत्राची जिल्हा न्यायालय प्रशासनाने गंभीर दखल घेत याबाबतची माहिती पोलिस यंत्रणेला दिली. पोलिस यंत्रणा देखील श्वान पथकासह न्यायालयात दाखल झाली. बॉम्ब ठेवल्याच्या धमकी पत्रामुळे जिल्हा न्यायालय परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. या घटनेने न्यायालयीन कामकाजावर परिणाम झाल्याचे स्पष्टपणे दिसत होते.दरम्यान बार असोसिएशनने देखील या प्रकरणाची गंभीर दखल घेत न्यायालयाच्या सुरक्षेच्या प्रश्नांवरुन तातडीची बैठक घेतली.
धुळे शहरातील स्टेशनरोडवरील जिल्हा न्यायालयातील दिवाणी न्यायाधीश चव्हाण हे त्यांच्या दालनात जात असतानात् यांना एक चिठ्ठीवजा पत्र आढळून आले. जिल्हा न्यायालयात बॉम्बठेवल्याच्या या निनावी पत्रात नमूदकरण्यात आले आहे. हे पत्र न्यायालय प्रशासनाने गंभीरपणे घेत पोलिस यंत्रणेला याबाबतची माहिती दिली. बॉम्बचा शोध घेण्यासाठी पोलिस पथक श्वानासह न्यायालयात हजर झाले. श्वानाच्या मदतीने बॉम्बचा शोध घेण्यात आला. मात्र, तपासणीत कोणताही बॉम्ब आढळून आला नाही. त्यामुळे न्यायालय प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला. याप्रकाराने कोर्ट परिसरात जोरदार खळबळ उडाली होती