धुळे भू-संपादन प्रकरण अपहार प्रकरण ; उपजिल्हाधिकार्‍यांसह वकीलांना आरोपी करण्याची मागणी

0

अनिल गोटे यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार ; कारवाई करण्याचे जिल्हा पोलीस अधीक्षकांना आदेश

अमळनेर- धुळे येथील भूसंपादन अपहार प्रकरणात उपजिल्हाधिकारी भारदे, भूसंपादन अधिकारी पंकज पवार, नोटरी करणारे अ‍ॅड.शैलेश जिंदाल व सर्व वकिलांना सहआरोपी करावे, अशी मागणी धुळ्याचे आमदार अनिल गोटे यांनी मुख्यमंत्र्यांसह पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांच्याकडे केली आहे. मुख्यमंत्र्यांनी पोलीस अधीक्षकांनीा चौकशी करून कार्यवाही करण्याचे आदेश 21 रोजी दिले असल्याचे सूत्रांनी सांगितले.

अफरातफरीत कट केल्याने उभयंतांना आरोपी करण्याची मागणी
अ‍ॅट्राटी अ‍ॅक्टच्या कलम 394 मध्ये आदिवासींच्या जमिनी शासनाच्या सक्षम अधिकार्‍यांच्या पूर्व परवानगीशिवाय कराराने खेडण्यासाठी सुद्धा घेऊ शकत नाही, विकत घेणे लेखापत्र करणे, मुखत्यारपत्र करणे हा सुद्धा गंभीर गुन्हा आहे. सौदा पावती करणे हा तर फार गंभीर गुन्हा आहे. धुळे जिल्हा भूसंपादन उपजिल्हाधिकारी भारदे , भूमापन अधिकारी पंकज पवार, अ‍ॅड.शैलेश जिंदाल तसेच नोटरी करणारे वकील कायद्याच्या तरतुदींची व्यवस्थित जाणीव व माहिती असूनदेखील आदिवासींच्या जमिनीची नोंदणी करून घेतली म्हणजे आदिवासींच्या जमिनीचा मिळणार्‍या मोबदल्यात अफरातफर करायच्या कटमध्ये हे प्रत्यक्ष सहभागी झाले असा त्याचा अर्थ होतो. पत्राचे व विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने कारवाई करावी. अशी मागणी आमदार अनिल गोटे यांनी मुख्यमंत्री व पोलीस अधीक्षकांकडे केली होती त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 21 रोजी जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षकांनी चौकशी करून कारवाई करावी, असे आदेश दिले आहेत

भू माफियांच्या चौकशीची मागणी मुख्यमंत्र्यांनी केली मान्य
धुळ्याचे आमदार अनिल गोटे यांनी आदिवासींच्या मालकीच्या व वंशपरंपरागत ताबे उपभोगात असलेल्या जमिनीचे आदिवासी संरक्षण कायदा कलम 3 व 4 चे उल्लंघन करून फसवणूक करणार्‍या भु माफियांविरुद्ध पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या अधिकारीच्या अध्यक्षतेखाली त्रीसदस्यीय समिती मार्फत चौकशी करावी अशी मागणीही केली होती त्यावरही मुख्यमंत्र्यांनी पोलीस महानिरीक्षकांनी चौकशीचे करावी, असे आदेश दिले आहेत.