धुळे- महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात येत असून या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी व मतदारांमध्ये जागृती निर्माण व्हावी यासाठी धुळे महापालिकेने मुख्याध्यापकांना एकत्रित करून जनजागृती पथकाची स्थापना केली आहे. या पथकामार्फत विविध उपक्रम व कार्यक्रम आयोजित करण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून आज सकाळी आठ वाजता शहरातील संपूर्ण भागात शाळेच्या विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी मतदान जनजागृती रॅलीचे आयोजन केले होते.
जनजागृतीच्या दृष्टीने महापालिकेतर्फे पथनाट्य महाविद्यालय युवकांचे चर्चासत्र यु ट्यूब फेसबुक द्वारे आवाहन करण्यात येत आहे. अशा प्रकारचे अभिनव उपक्रम करण्यात येत आहे.
आज झालेल्या रॅलीत चिमुकल्या विद्यार्थ्यांनी मतदारांमध्ये जनजागृती करता धुळेकर नागरिकांचे लक्ष वेधून या गुलाबी थंडीत धुळे महापालिकेच्या बिगुल वाजवला यामुळे शहरातील वातावरण तापले आहे त्यात मतदारांनी प्रत्यक्ष मतदान यादी चा दिवस आपला हक्क बजावला पाहिजे या उद्देशाने धुळे महापालिकेतर्फे जनजागृती सुरू आहे त्याचे उद्घाटन हायस्कूल येथे आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सुधाकर देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले .यावेळी उपायुक्त रवींद्र जाधव, महाराष्ट्र संचालक प्राथमिक विद्यामंदिर हायस्कूल येथे शांताराम गोसावी येथे मनपा शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी महेंद्र जोशी व इतर अधिकारी व शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका मोठ्या संख्येने सहभागी झाले होते