धुळे- महापालिका निवडणुकीसाठी सोमवारी उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा शेवचा दिवस असल्याने कोण माघार घेणार ? याकडे धुळेकरांचे लक्ष लागले आहे. रविवारी निवडणूक आयोगाचे निरीक्षक सौरभ विजय यांनी भेट दिली. सकाळी त्यांनी निवडणूक अधिकारी आणि कर्मचारी यांची कार्यशाळेत मार्गदर्शन केले. निवडणूक यंत्राची तपासणी केली असता तब्बल 120 यंत्र खराब असल्याचे आढळून आले आहे. धुळे महापालिका निवडणुकीत सोमवारी उमेदवारी अर्ज माघार घेण्याची शेवटची तारीख आहे त्यामुळे सोमवारी निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. निवडणुकीच्या प्रथम टप्प्यात 320 मतदान यंत्र प्रशासनाला प्राप्त झाली होते त्यापैकी तब्बल 120 यंत्र खराब असल्याचे आढळले आहे. धुळे महापालिका निवडणुकीत 18 उमेदवार हे न्यायालयात गेले आहेत. सोमवारी त्याबाबत निकाल समोर येणार आहे. निवडणूक आयोगाचे निरीक्षक यांनी आरो कार्यालयाला भेट दिली आहे. काही संवेदनशील केंद्र आहेत त्याकडे विशेष लक्ष द्यावे अशी सूचना त्यांनी दिली आहे.