अमळनेर- धुळे येथील भूसंपादन अपहार प्रकरणात उपजिल्हाधिकारी भारदे भूसंपादन अधिकारी पंकज पवार, नोटरी करणारे अॅड.शैलेश जिंदाल व सर्व वकिलांसह आरोपी करावे अशी मागणी आमदार अनिल गोटे यांनी मुख्यमंत्री यांच्यासह पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांच्याकडे केली आहे. मुख्यमंत्र्यांनी पोलीस अधीक्षकांनी चौकशी करून कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत
अट्रोसिटी अॅक्टच्या कलम ३९४ मध्ये आदिवासींच्या जमिनी शासनाच्या सक्षम अधिकाऱ्यांच्या पूर्व परवानगीशिवाय कराराने खेडण्यासाठी सुद्धा घेऊ शकत नाही विकत घेणे लिखापत्र करणे , मुखत्यारपत्र करणे हा सुद्धा गंभीर गुन्हा आहे सौदा पावती करणे हा तर फार गंभीर गुन्हा आहे. धुळे जिल्हा भूसंपादन उपजिल्हाधिकारी भारदे , भूमापन अधिकारी पंकज पवार, अॅड.शैलेश जिंदाल तसेच नॉटरी करणारे वकील कायद्याच्या तरतुदींची व्यवस्थित जाणीव व माहिती असून देखील आदिवासींच्या जमिनीची नोंदणी करून घेतली म्हणजे आदिवासींच्या जमिनीचा मिळणाऱ्या मोबदल्यात अफरातफर करायच्या कटमध्ये हे प्रत्यक्ष सहभागी झाले असा त्याचा अर्थ होतो. पत्राचे व विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने कारवाई करावी अशी मागणी आमदार अनिल गोटे यांनी केली होती त्यावर मुख्यमंत्र्यांनी जळगाव जिल्हा पोलीस अधिक्षकांनी चौकशी करून कार्यवाही करावी असे आदेश दिले आहेत.
दरम्यान अनिल गोटे यांनी आदिवासींच्या मालकीच्या व वंशपरंपरागत ताबे उपभोगात असलेल्या जमिनीचे आदिवासी सरंक्षण कायदा कलम 3 व 4 चे उल्लंघन करून फसवणूक करणाऱ्या भु माफियाविरुद्ध पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या अधिकारीच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती मार्फत चौकशी करावी अशी मागणीही केली होती त्यावरही मुख्यमंत्र्यांनी पोलीस महानिरीक्षकांनी चौकशीचे करावी असे आदेश दिले आहेत.