एलसीबी पथकाची धडक कारवाई : अवैध गुटखा विक्रेत्यांमध्ये खळबळ
धुळे- शहरातील भंगार बाजार परीसरातून एलसीबीच्या पथकाने छापा टाकून सुमारे साडे सतरा लाख रुपये किंमतीचा बेकायदा बाळगलेला गुटका आणि पानमसाला जप्त करण्या आला. याप्रकरणी एकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधिक्षक एम.रामकुमार,अप्पर पोलिस अधीक्षक विवेक पानसरे, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, एलसीबीचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांनी धुळे शहरातील अन्सार नगर भंगार बाजार येथे आणि 80 फुटी रोडवरील एका अपार्टमेंटमध्ये छापा टाकला असता लाखो रुपये किंमतीचा गुटका आणि पानमसाला मिळून आला. या साठ्यात विमल, हिरा गुटका आणि रजणीगंधा पानमसाला आदीचा मोठा साठा हस्तगत झाला. जप्त करण्यात आलेल्या रजनी गंधा पानमसाल्याची किंमत 4 लाख 43हजार 200 रुपये तर विमल गुटका व जर्दा तंबाकू मालाची किंमत 10 लाख 80 हजार रुपये तसेच हिरा गुटका आणि जर्दा तंबाकू मालाची किंमत दोन लाख 28 हजार रुपये इतकी लावण्यात आली आहे. याप्रकरणी संशयीत मोहसीन करीम तांबोळी (वय 32) (रा.अन्सार नगर) याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि एस.बी.भाबड, पोनि अनिल पाटील, हे.कॉ.महेंद्र कापुरे, नथ्थु भामरे, सुनिल विंचुरकर, संदीप थोरात, हिरालाल ठाकरे, प्रभाकर बैसाणे, श्रीकांत पाटील, मायुस सोनवणे, गौतम सपकाळे, कुणाल पानपाटील, अशोक पाटील, तुषार पाटील, उमेश पवार, रविकिरण राठोड, विशाल पाटील, मनोज पाटील, मनोज बागुल, चेतन कंखरे, विजय सोनवणे, केतन पाटील आदींनी केली.