धुळे शहरात घराला आग, संसारोपयोगी साहित्य खाक

0
धुळे :– शहरातील साक्री रोडवरील मोती नाल्यानजीकच्या मोती नगरातील घराला शॉर्ट सर्किटने आग लागल्याने घरातील संसारोपयोगी वस्तूंसह साहित्य जळून खाक झाले. सोमवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
सलमा बी. शेख मुसा यांच्या राहत्या घराला आग लागल्याने 90 हजारांची रोकड तसेच अन्य संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या. अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले असून आग विझवण्याचे काम सुरू होते.