धुळे शहरासह जिल्ह्यात गरबा, दांडियाची धूम

0

धुळे- बुधवारपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात झालेली आहे. शहरासह जिल्ह्यातील सार्वजनिक मंडळांतर्फे आयोजित गरबा, दांडिया खेळण्यासाठी युवक,युवतीसह सर्व वयोगटातील नागक्षहकांची गर्दी होत आहे. सर्वजन गुजराती, हिंदी गीतांवर दांडिया,गरबा खेळण्याचा मनासोक्त आनंद लुटत आहेत. दरम्यान मंदिरांमध्ये देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होऊ लागली आहे. घटस्थापनेच्या दिवशी दुर्गादेवीच्या स्थापनेत नागरिक, कार्यकर्ते उशिरापर्यंत व्यस्त होते. त्यामुळे पहिल्या दिवशी अनेक मंडळांमध्ये गरबा,दांडिया फार रंगला नाही. मात्र गुरुवारी दुसर्या दिवशी गरबा रंगताना दिसला. त्यासाठी जय्यत तयारी आधीच पूर्ण करण्यात आली होती. शहरातील अग्रवालनगर, जयहिंद चौक, दत्तमंदिर चौक, नगावबारी, परिसर, कुमारनगर, गवळीवाडासह विविध भागात त्या-त्या परिसरात देवीच्या मंदिरासमोर तसेच गरबा खेळणार्याच्या ठिकाणी आकर्षक मंडप टाकून चमकी लावण्यात आली आहे. काही ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा विद्युत रोशणाई करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वत्र चैतन्य पसरले आहे. मंडळांतर्फे या काळात आयोजित विविध प्रकारच्या स्पर्धा, कार्यक्रमांनाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतांना दिसत आहे. शहरात अनेक मंडळांतर्फे गरबा दांडियाचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र रात्री 10 वाजताच सर्व ध्वणीनियंत्रण बंद करण्यास भाग पाडले जात असल्याने काही ठिकाणी नाराजीही दिसून देत आहे. मुळात गरबा,दाडिया या रात्री साडेआठ नऊ वाजेपासून सुरु होतात. अर्धातास होत नाही तोच गरबा, दांडिया बंद करण्याच्या सूचना येतात. 11 वाजेपर्यंत तरी गरबा,दांडिया खेळण्याची परवानगी मिळार्वीें अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.