भुसावळ- धुळ्याचे अपर पोलिस अधीक्षक विवेक पानसरे यांची ठाणे शहर उपायुक्तपदी बदली झाली असून अमळनेरचे पोलिस उपअधीक्षक रफिक शेख यांचीही नवी मुंबईत सहाय्यक पोलिस आयुक्तपदी बदली झाली. गृह विभागाचे उपसचिव कैलास गायकवाड यांनी बुधवारी सायंकाळी बदल्यांचे आदेश जारी केले. बदली झालेले अधिकारी गुरुवारीच आपला पदभार स्वीकारणार आहेत.