धुळ्यातील कल्याण मटका आयजी पथकाच्या रडारवर : दोन धाडींमध्ये 26 संशयीत जाळ्यात

दिड लाखांचा मुद्देमाल जप्त : अवैध व्यावसायीकांच्या गोटात प्रचंड खळबळ

भुसावळ/धुळे : अवैध धंद्यांवर नाशिक आयजींच्या विशेष पथकाने छापा टाकल्याने अवैध व्यावसायीकांच्या गोटात खळबळ उडाली. या प्रकरणी 26 संशयीतांना अटक करण्यात आली असून दिड लाखांचामुद्देमाल जप्त करण्यात आला तर या प्रकरणी धुळे शहर पोलिसात स्वतंत्र दोन गुन्हे दाखल करण्यात आले.

यांच्याविरोधात कारवाई
शहरातील धुळे रोडवरील दादावाडी शैक्षणिक सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे मालक गोविंद जोतीराम साकला व मँनेजर संतोष परदेशी यांच्यासह 22 ग्राहकांना कल्याण सट्टा खेळताना पथकाने रंगेहाथ अटक केली. संशयीताकडील 16 मोबाईलसह 72 हजार 930 रुपयांची रोकड मिळून एक लाख 21 हजार 430 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तर दुसरी कारवाई पाचकंदील भागातील गल्ली क्रमांक दोन मध्ये करण्यात आली. शेरेपजांब हॉटेलसमोरील चौधरी मार्केटजवळ संशयीत राकेश मोहनलाल अग्रवाल व संदीप अशोक मोहिते यांच्याकडून 29 हजार 580 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. ही कारवाई नाशिक आयजी डॉ.बी.जी.शेखर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरीष्ठ निरीक्षक बापू रोहोम, सहाय्यक निरीक्षक सचिन जाधव, एएसआय बशीर तडवी, हवालदार रामचंद्र बोरसे, सचिन धारणकर, नाईक मनोज दुसाणे, कुणाल मराठे, प्रमोद मंडलिक, चालक सुरेश टोंगारे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.