धुळ्यातील गो.पी.लांडगे यांना इंगळे पुरस्कार

0

धुळे । महाराष्ट्रातील पत्रकारांची पहिली संघटना मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा जीवन गौरव पुरस्कार यंदा ज्येष्ठ पत्रकार, विचारवंत आणि तरुण भारतचे माजी संपादक मा. गो. तथा बाबूराव वैद्य यांना जाहीर झाला आहे. 25 हजार रुपये रोख, मानपत्र, स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. परिषदेच्या अन्य 11 पुरस्कारांचीही घोषणा करण्यात आली आहे. मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने दरवर्षी पत्रकारितेत उत्कृष्ट काम करणार्‍या तरुण आणि ज्येष्ठ पत्रकारांना विविध पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नागपुरात वितरण
भगवंतराव इंगळे पुरस्कार धुळे येथील ज्येष्ठ पत्रकार तथा एकला चलो रे नियतकालिकाचे संपादक गो. पी. लांडगे यांना जाहीर करण्यात आला आहे. रोख रक्कम, मानपत्र, स्मृतीचिन्ह असे या सर्व पुरस्कारांचे स्वरूप आहे. जूनच्या तिसर्‍या आठवड्यात नागपूर येथे होणार्‍या एका कार्यक्रमात मा. गो. वैद्य यांना जीवन गौरव पुरस्काराने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सन्मानित केले जाणार असल्याची माहिती मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष एस. एम. देशमुख यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.