धुळ्यातील दोघांच्या खूनप्रकरणी एकास निजामपूरातून अटक

0

धुळे- शहरातील देवपूर परिसरात रावसाहेब पाटील व वैभव पाटील यांचा खून झाला होता. ही घटना 8 जूनला घडली होती. या प्रकरणी पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाचे धागेदोरे साक्री तालुक्यातील निजामपूरपर्यंत होते. अर्जून अहिरे याचे नावही या प्रकरणात पुढे आले होते. तो फरार होता. अहिरे निजामपूर येथे आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार एलसीबीच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. या प्रकरणातील तीन संशयीत अद्यापही पसार असून त्यांचा कसून शोध सुरू आहे.