धुळ्यातील लाचखोर भूमापक न्यायालयीन कोठडीत

0

प्लॉट मोजणीसाठी दीड मागितल्याने एसीबीने केली होती कारवाई

धुळे- प्लॉट मोजणीसाठी दीड हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी रमेश त्र्यंबक आढारे या भूमापकास रविवारी धुळे एसीबीने अटक केली होती. आरोपीला सोमवारी न्यायालयात हजर केले असता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.

शासकीय शुल्कानंतरही मागितली लाच
वलवाडी शिवारातील प्लॉट मोजण्यासाठी शासकीय सहा हजारांचे शुल्क भरूनही भूमापक आढारे यांनी दिड हजारांची मागणी केल्यानंतर तक्रारदाराने धुळे एसीबीकडे तक्रार नोंदवली होती मात्र तक्रारदाराच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्यांनी लाच स्वीकारली नाही मात्र लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याने पथकाने आरोपीस अटक केली. या प्रकरणी आढारे याच्याविरुद्ध पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सुनील कुर्‍हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक महेश भोरटेकर व सहकार्‍यांनी केली.