धुळ्यातील लाचखोर सर्वेक्षक एसीबीच्या जाळ्यात

0

धुळे : वनविभागाच्या हद्दीतील विहीर खोदण्याची परवानगी देण्यासाठी 15 हजाराची लाच मागणाऱ्या सर्वेक्षक मनोहर जाधव यांना धुळे एसीबीच्या पथकाने शिव तीर्थाजवळील वनविभागाच्या मुख्य कार्यालयात शुक्रवारी दुपारी अटक केली. ही कारवाई धुळे एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पवन देसले व महेश भोरटेकर यांनी केली.