धुळ्यात गोरक्षकांच्या तत्परतेमुळे 30 जनावरांची सुटका

0

धुळे। शिरपूर बाजारातून जनावरे भरून येथे कत्तलीसाठी बुधवारी 23 ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास जाणार ट्रक ट्रक (एमएच 18 एम 7728) हा नरडाणा पोस्टेच्या हद्दीत सागर पाटील, जितेंद्र पाटील, विजय पारधी, पवन मराठे या गोरक्षकांनी पोलिसांच्या मदतीने अडविला.

व ट्रकची पाहणी करत असताना ट्रक चा ड्रायव्हर गाडी सोडून पळून गेला पशुकल्याण अधिकारी शिवशंकर स्वामी यांनी धुळे पोलीस अधीक्षक श्री. रामकुमार साहेब यांना संपर्क करून सदरची माहिती दिली व महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याप्रमाणे कारवाईची मागणी केली गाडी पोलिसात आणून पाहणी करता गाडीत 30 बैल दाटीवाटीने भरलेली होती. त्यात काही जनावरे ही खाली पडली होती व त्यांच्यावर बाकीचे जनावरे उभी राहिलेली दिसली काही जनावरे चेंगरल्यामुळे खूप जखमी झालेली होती. अशी हृदयद्रावक परिस्थिती गोरक्षकांना दिसून आली. गोरक्षक नेहमी आपला राग व्यक्त करतात अशी तक्रार केली जाते.