धुळ्यात तरूणावर तलवरीने हल्ला

0

धुळे – मागील भांडणाच्या कारणावरुन 9 जणांनी लोखंडी पाईप अन तलवारीने तरुणावर वार करुन जबर जखमी केल्याची घटना देवपुरात संध्याकाळी घडली आहे. ग.नं.14,जुने धुळे येथे राहणार्‍या रुनल दिनेश बडगुजर (वय 19) या तरुणाने देवपुर पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार देवपुरातील जवाहर स्टेडियम येथे कुस्तीवरुन झालेल्या भांडणाची कुरातप काढून अविनाश परदेशी, मयुर सूर्यवंशी, सागर कांबळे, दत्तु भिल, अजय कांबळे, लोटन लोणारी, राहुल सूर्यवंशी, लखन लोणारी आणि गौरव यांनी लोखंडी पाईपाने आणि तलवारीने रुनल बडगुजरवर हल्ला केला. त्यात तो जबर जखमी झाला. त्याच्यावर हल्ला होत असतांना त्याच्या हातातील साडेपाच तोळे वजनाचे सोन्याचे ब्रेसलेट, मोबाईल बळजबरीने हिसकावले. त्याला ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी आरोपींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.