धुळ्यात दगडफेकप्रकरणी 9 जणांवर गुन्हा

0

धुळे । जुने धुळ्यातील भोई गल्ली परिसरात असलेल्या काझी मशीद जवळ गोंधळ घालणार्‍या 9 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून अन्य 6 जणांवर दगडफेकीसह वाहनाचे नुकसान केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत माहिती अशी की, काल दुपारी दीडच्या सुमारास भोई गल्ली काझी मशीदपासून कानबाई विसर्जनाची मिरवणूक जात असतांना विजय जाधव, लड्ड्या पहेलवान जाधव, अक्षय उर्फ बाबा सोनार, दीपक पराटे उर्फ चालीस, अक्षय श्रावण साळवे, राहुल साळवे, सनी जाधव, जयेश खरात, प्रतिक अजय चव्हाण यांच्यासह जमावाने गोंधळ घालून एमएच 18/बीजे 8055 या बुलेट दुचाकीवर दगडफेक केली. त्यामुळे त्यांना ताब्यात घेवून त्यांच्यासह अन्य सहा जणांवर सामान्य नागरिकांच्या जिवीतास धोका उत्पन्न करणारी कृती केली. तसेच जिल्हाधिकार्‍यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले म्हणून गुन्हा दाखल केला आहे. उपनिरिक्षक हनुमान उगले यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे.