धुळ्यात दोन कोटींचा गुटखा जप्त : पाच आरोपी जाळ्यात
दिल्लीहून मुंबईत होत होती चोरटी वाहतूक : धुळे गुन्हे शाखेची कारवाई
Dhule LCB Gutkha Karwai धुळे : धुळे स्थानिक गुन्हे शाखेने गोपनीय माहितीच्या आधारे रविवारी तब्बल चार कंटेनरमधून दोन कोटींचा गुटखा जप्त केला आहे. संशयीत दिल्लीहून मुंबईत हा गुटखा नेत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
धुळे गुन्हे शाखा निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना चार कंटेनरमधून प्रतिबंधीत गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर आर्वी गावाजवळील पुरमेपाडा गावाजवळ चार कंटेनर जप्त करण्यात आले. त्यांची तपासणी केली असता त्यात गुटखा आढळला. पथकाने एक कोटी 30 लाख 49 हजार 280 रुपये किंमतीचा गुटखा, 60 लाखांचे कंटेनर व 25 हजार रुपये किंमतीचे पाच मोबाईल जप्त करण्यात आले. संशयीतांविरोधात राजेंद्र सपकाळे यांच्या फिर्यादीनुसार धुळे तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे गुन्हे शाखेचे निरीक्षक शिवाजी बुधवंत, सहाय्यक निरीक्षक प्रकाश पाटील, बाळासाहेब सूर्यवंशी, रफिक पठाण, गौतम सपकाळे, राहुल सानप, प्रकाश सोनार, संदीप सरग, कैलास महाजन, संजय सुरसे आदींच्या पथकाने केली.