धुळे- धुळ्यातील राज्य राखीव दलाचा मैदानावर 29 आणि 30 सप्टेंबर रोजी भारतीय संरक्षण दलाचे जवान विविध प्रात्यक्षिक दाखविणार आहेत. भारताच्या संरक्षणासाठी जवान कशी तयारी करतात, सैन्याचे सामर्थ्य, तोफा, रणगाडे, घोडतळ, वाहनाचे पथक, हवाई कसरती यावेळी होणार आहे. सैन्य दलाचे आगे बढो ह्या कार्यक्रमांतर्गत हे प्रात्यक्षिक केले जाणार आहे. धुळेकरांना ही परवणीच ठरणार आहे. नागरीकांना हे प्रात्येक्षिक पाहता येणार आहे, अशी माहिती केंद्रीय संरक्षण राज्य मंत्री डॉ.सुभाष भामरे यांनी दिली. शनिवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री भामरे बोलत होते. दोन दिवस चालणार्या सैन्यदलाच्या प्रात्यक्षिक प्रशिक्षणात सैन्य दलात भरती व सैन्याची माहिती देणारे स्टॉल लावण्यात येणार आहे. तोफा, रणगाडे, घोडतळ, वाहन पथक, हवाई दलाच्या कसरती, कंमाडो दलाचे जवान हेलीकॉपटर वरून दहशदवादी स्थळ कशी उध्दवस्त करतात, इमारतीवर उतरुन लोकांची सोडवणूक कशी करतात. याचेही प्रात्येक्षिक यावेळी केले जाणार आहे. मिलीटरी डॉग शो, मोटार साईकल प्रात्येक्षिक, बॅन्ड शो यासारखे विविध प्रात्येक्षिक होणार आहे. धुळ्यातील सर्व महाविद्यालयीतील विद्यार्थी, पालक, नागरिकांनी हे प्रात्येक्षिक पहावे असे आवाहन केंद्रीय संरक्षण राज्य मंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी केले आहे. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार उपस्थित होते.