20 लाखांचा मुद्देमालासह वाहने व 19 मोबाईल जप्त
धुळे- दुचाकीवर धूम स्टाईल पध्दतीने नागरिकांच्या हातातून मोबाईल पळविणार्या टोळीला जेरबंद करण्यात धुळ्यातील मोहाडी पोलिसांना यश आले आहे. त्रिकुटाला अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 20 लाख रुपये किमंतीचे मोबाईल व दुचाकी वाहने जप्त करण्यात आले आहेत. संशयीत चोरट्यांकडून अजून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. 7 सप्टेंबर रोजी सायंकाळी मोहाडी परिसरातील नरेंद्र पाटील हे सेवा ऑटोमोटीव्ह सर्विस अवधान मोहाडी येथून डयुटी आटोपुन हॉटेल रेसीडेन्सी पार्कच्या दिशेने पायी जात होते. यावेळी अचानक एक दुचाकी भरवेगात आली. वाहनाच्या मागच्या शिटवर बसलेल्या इसमाने त्यांच्या हातातील 18 हजार रुपये किमंतीचा सॅमसंग जे8 पळवून नेला. याप्रकरणी मोहाडी पोलीस ठाण्यात भादंवि कलम 392 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. चालत्या नागरीकांचे मोबाईल पळविणारे चोरटे चोरी केलेल्या मोबाईलची विल्हेवाट लावण्यासाठी जिल्हा रुग्णालय परीरसरात फिरत असल्याची माहिती पोीसांना मिळाली होती. पोलिसांनी चोरीचे मोबाईल विक्री करताना भीमा पुना निकम (रा.नटराज टाकी मागे, निळा चौक), हिमांशु राजेंद्र रोकडे आणि आकाश शंकर ठाकरे (रा.जलाराम मंदीर जवळ नटराज टाकी मागे) या तिघांना अटक केली. तीघा चोरट्यांकडून गुन्ह्यांमधील 19 मोबाईल व दुचाकी हस्तगत करण्यात आले आहेत. त्यांची किंमत 2 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मोहाडी पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक डी.एस.मोरे, पोलिस कर्मचारी प्रभाकर ब्राम्हणे, गणेश भामरे, देवा वाघ आदींनी ही कारवाई केली.