धुळ्यात आजी-माजी आमदारांनी केले मतदान!

0

धुळे: शिरपूर शहरासह ग्रामीण भागातही मतदान करण्यासाठी मतदात्यामध्ये उत्साह दिसून येत आहे. माजी आमदार अमरिश भाई पटेल व नगराध्यक्ष सौ.पटेल यांनी सकाळी मतदान केले. सुळे येथे आमदार काशीराम पावरा यांनी मतदान केले. तऱ्हाड कसबे येथे महिला व अपंगांसाठी विशेष सुविधा प्रशासनाकडून पुरविण्यात आली आहे. तऱ्हाडी,विखरण, वाघाडी, खामखेडा प्रथा , बोराडी, जळोद येथे मतदारांचा उत्साह दिसून आला.

आज महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्यातील लोकसभेसाठी मतदान होत आहे. धुळ्यात सकाळी 11 वाजेपर्यंत 18 टक्के मतदान झाले होते. शहरातील मतदान केंद्रांवर मतदारांचा उत्साह दिसून येत आहे.