धुळ्यात पाचव्या दिवशीही शेतकरी आक्रमक

0

धुळे । शेतकरी संपाच्या पाचव्या दिवशी शेकर्‍यांनी अधिक आक्रमक भूमिका घेत महाराष्ट्र बंदची हाक दिली. आज सकाळपासूनपच संपकरी शेतकर्‍यांनी राज्यासह धुळे जिल्ह्यात व तालुक्यांमध्ये विविध मार्गाने आंदोलन करीत सरकारची झोप उडवून लावली. धुळे जिल्हा शिवसेनेने धुळे शहरात बंदचे आवाहन करुन व्यापार्‍यांना व व्यावसायिकांना दुकानं बंद करायला भाग पाडले. धुळे तालुक्यातील कापडणे, उडाणे, नेर येथे शेतकर्‍यांनी उत्स्फुर्तपणे आंदोलन केलीत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीही कुसुंबा येथे भाजीपाला, फळ, दुध रस्त्यावर टाकून आंदोलन केले. साक्री तालुक्यातही सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा, वकील संघ, शिवसेना, राष्ट्रवादी, व्यापारी संघटना यांनी शेतकर्‍यांना संपाला पाठींबा देत सोमवारी बंदची हाक दिली होती. शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा गावातही कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी शेतकरी व विविध राजकीय पक्षांची बहुतांश आंदोलने महामार्गावर झाल्याने ठिकठिकाणी वाहतूकीची कोंडी झाली होती. यावेळी जिल्ह्यातील धुळे, आर्वी, शिंदखेडा, दोंडाईचा, शिरपूर, साक्री येथील एकूण सहा बाजार समित्यांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आल्याने तेथे शुकशुकाट होता.

शेतकरी बंदला शिवसेनेचा पाठिंबा
धुळे जिल्हा शिवसेनेने शेतकर्‍यांच्या या संपाला पाठींबा दर्शविला. धुळे शहरात शिवसेना कार्यकर्त्यांनी आग्रारोडवरील दुकानदारांना दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. तर पाचकंदील परिसरातील भाजीपाला, फळ विक्रेत्यांना दुकाने बंद करण्यास भाग पाडले. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हिलाल माळी, महानगरप्रमुख सतिष महाले, शिवआरोग्य सेनेच्या डॉ.माधुरी बाफना, गंगाधर माळी, शिवसेना महिला आघाडीच्या हेमा हेमाडे, साक्रीच्या कविता क्षिरसागर, युवासेनेचे पंकज गोरे, प्रफुल्ल पाटील, शेखर वाघ, चंद्रकांत म्हस्के, डॉ.सुनिल महाजन, नंदाताई सैंदाणे, उज्वला काटकर, दिनेश पाटील, नरेंद्र अहिरे, रंजना पाटील, आशाबाई पाटील, भरत मराठे, जनार्दन पाटील, सत्यजित पाटील, शालिक राठोड, कैलास मराठे, पुरुषोत्तम जाधव, योगेश मराठे, देविदास लोणारी, राजेंद्र माळी, महावीर जैन, पवन जगताप,पंकज भारस्कर, गुलाब सोनवणे, देवराम माळी, अमोल पसारी,सुनंदा तावडे आदी शिवसेनेच्या महिला व पुरुष कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी शांततेला गालबोट लागू नये, म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी हिंमत जाधव यांच्या नेतृत्वाखाली आझादनगर पोलीस स्टेशनचे निरीक्षक रमेशसिंह परदेशी, शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक अनिल वडनेरे यांच्यासह पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

साक्रीत वकील-व्यापार्‍यांचा संपाला पाठिंबा
साक्री । शेतकरी संपाच्या पार्श्‍वभूमिवर सोमवारी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदमध्ये साक्री येथील विविध राजकीय पक्ष, संघटनांसह वकिल आणि व्यापारी संघटनांनी बंदला पाठींबा दिल्याने शहरात सर्वत्र शंभर टक्के बंदचा अनुभव आला. सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेने शेतकरी संपाला जाहीर पाठींबा देत शेतकरी हिताच्या डझनभर मागण्यांचे निवेदनच तहसिलदारांना दिले. किशोर ढमाले, सुभाष काकुस्ते यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात करणसिंग कोकणी, रामसिंग गावित, हिलाल महाजन, राकेश सोनवणे, दिलीप उंदासे, बाळू सोनवणे यांचेसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभाग नोेंदविला. शेतकरी संपाला साक्री तालुक्यातील सर्व राजकीय पक्ष, संघटनांसह व्यापारी व व्यावसायीकांचा संघटनांनी पाठींबा दिला आहे. त्यात शिवसेनेचे पंकज मराठे, बंडू गिते, युवक काँग्रेसचे दिपक साळुंखे, शेतकरी संघटनेचे राजाराम साळुंखे, माजी सरपंच वैभव सोनवणे, प्रहार संघटनेचे श्यामकांत सोनवणे, रोहडचे सरपंच हेमंत साबळे, माजी सभापती प्रदिप सोनवणे, युवासेनेचे विक्की बाबर, व्यापारी धनराज चौधरी, गणेश बागले, राजेंद्र संचेती, शेतकरी वेडू सोनवणे आदींचा समावेश आहे. तर कापड व्यापारी असोसिएशन, हॉटेल असोसिएशन, मोबाईल असोसिएशन, अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ यांनीही पाठींबा दिला आहे. शेतकर्‍यांच्या या संपाला साक्री तालुक्यातील वकिलांनीही पाठींबा दिला असून तसे पत्र अ‍ॅड.उत्तमराव मराठे, अ‍ॅड.गजेंद्र भोसले, अ‍ॅड.पुनम काकुस्ते, अ‍ॅड.टी.व्ही.पाटील यांनी प्रसिद्धीस दिले आहे. वकिलांनी कामकाज बंद ठेवून शेतकरी संपास पाठींबा दिल्याचे या पत्रकात म्हटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा
शेतकरी संप आणि महाराष्ट्र बंदला साक्री तालुका राष्ट्रवादी काँग्रेसने पाठींबा दर्शविला असून शेतकर्‍यांना संपुर्ण कर्जमाफी मिळावी, स्वामीनाथन आयोगाचा अहवाल लागू करावा आणि शेतकर्‍यांच्या मागण्या मान्य करुन संप मिटवावा असे निवेदनच तहसिलदारांना दिले. निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा.नरेेंद्र तोरवणे, सुरेशआबा सोनवणे, चंद्रकांत पवार, संजय अहिरराव, शरद भामरे, अर्पणाताई भामरे, राजकुमारी रॉय, सतिष बेडसे, भूषण बोंद्रे, गोविंद देवरे, दिनेश नेरकर, सतीष पगार आदींची नावे आहेत.

कुसुंबा येथे राष्ट्रवादीचे आंदोलन
राष्ट्रवादी काँग्रेसने शेतकर्‍यांच्या संपाला पाठींबा दर्शवित कुसुंबा गावात आंदोलन केले. आज धुळे सुरत रोडवरील कुसुंबा गावाजवळ राष्ट्रवादीचे किरण शिंदे, किरण पाटील यांच्यासह शेतकर्यांनी भाजीपाला, फळ, दुध रस्त्यावर टाकून आंदोलन केले. यावेळी वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

उडाणेत शेतकर्‍यांचा रास्ता रोको!
तालुक्यातील उडाणे येथील शेतकर्‍यांनी गावातील दूध, भाजीपाल्यासह कांदे महामार्गावर आणून रास्तारोको आंदोलन केले. उडाणेचे शेतकरी धर्मराज बागुल यांच्या नेतृत्वात सोेमनाथ बागुल, अर्जुन पाटील, ग्यानू मासुळे, विजय पाटील, दगडू पाटील, आनंदा पाटील, भटू मासुळे आदी उपस्थित होते.

महामार्गावरील वाहतूक ठप्प
शेतकर्‍यांच्या या आंदोलनामुळे धुळे-साक्री दरम्यानची दुतर्फा वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागल्या होत्या. शेतकर्यांनी संयमाने हे आंदोलन केल्याने कुठल्याही वाहनचालकाला त्रास झाला नाही.