धुळ्यात पोलीस भरती पारदर्शक होणार

0
पोलीस अधीक्षक एम.रामकुमार ; गैरप्रकार करणार्‍यांवर एसीबीसह गुन्हे शाखेची नजर
धुळे : धुळे जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस शिपाई या पदासाठी भरती 12 मार्च पासून भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. ही भरती त्यंत पारदर्शक पध्दतीने होणार असून भरती प्रक्रियेवर सीसीटीव्ही तसेच व्हिडिओ कॅमेर्‍यांची  नजर राहणार आहे. भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवारांनी कुठलाही गैरप्रकार करू नये वा तसा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे शिवाय पारदर्शक पद्धत्तीने भरती प्रक्रिया राबवण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागासह गुन्हे शाखेची नजरही राहणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक एम.रामकुमार तसेच अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसने यांनी दिली. दोषी उमेदवार आढळल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जाणार असल्याचे कळवण्यात आले आहे.