धुळ्यात भीषण अपघातात दोन प्रवासी ठार

0

धुळे : धुळ्यात एसटी बसचा आणि आयशर गाडीचा भीषण अपघात झाल्याची घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मुंबई-आग्रा महामार्गावर पुरमेपाडा गावाजवळ एका एसटी बसला आयशर गा़डीने धडक दिल्यानं मोठा अपघात झाला आहे.

यात बसच्या वाहकासह दोन प्रवाशांचा मृत्यू झाला, तर एक प्रवाशी जखमी झाला आहे. नाशिक-जळगाव ही एसटी बस रस्त्याच्या कडेला पंक्चर झाल्यामुळे उभी होती. धुळ्याच्या दिशेने जाणा-या आयशरने एसटी बसला जोरदार धडक दिली आणि बसच्या बाजूला उभे असलेल्या वाहक आणि प्रवाशांना चिरडले. अपघातानंतर आयशरचा चालक गाडी घेऊन फरार झाला आहे. धुळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पोलीस चालकाचा शोध घेत आहेत.