धुळ्यात मराठा आमदारांचा प्रतिकात्मक पिंडदान व दशक्रिया

0

धुळे :मराठा आरक्षणाच्या न्याय मागण्यासाठी सहा दिवसांपासून मराठा क्रांती मोर्चाच्यातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे. आज देखील आंदोलन सुरू आहे. 25 जुलै रोजी मराठा समाजाच्या आरक्षण संदर्भात विधिमंडळात आवाज न उठवणारे मराठा समाजातील सर्व आमदारांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दहन करण्यात आले होते. आज गुरूवारी मराठा समाजाचे आरक्षण संदर्भात आवाज न उठवणारे मराठा आमदारांचा पिंडदान करून दशक्रिया विधी करण्यात आला. सरकार व आमदारांचा निषेध व्यक्त करत आंदोलकांनी मुंडन केले.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू आहे. आंदोलकांनी आक्रमक होत मराठा समाजाच्या आरक्षण संदर्भात आवाज न उठवणारे मराठा समाजातील सर्व 147 आमदारांचा नावाने श्राध्द घालत मुंडन केले. छत्रपती शिवाजी महाराज की जय , अस कस देत नाही. घेतले शिवाय रहात नाही. एक मराठा लाख मराठा या घोषणांनी आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी मराठा मोर्चाचे अध्यक्ष मनोज मोरे, भोला वाघ, मोहन नवले, संजय वाल्हे, दिपक रंवदळे,शितल नवले, कुणाल पवार, योगेश थोरात, संजय पाटील, पवन मराठे, यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.