धुळे। शेतकर्यांना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसची युवा किसान संघर्ष यात्रा 10 ते 15 जून 2017 या कालावधीमध्ये धुळ्यात आयोजित करण्यात आली आहे. या संघर्ष यात्रा त्या-त्या लोकसभा, जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणी, शहरांमध्ये होणार आहे.
महाराष्ट्रातील शेतकर्यांना कर्ज माफी मिळावी, त्यांच्या शेतीमालाला योग्य दर मिळावा, वाढलेली महागाई, तरुणांची बेरोजगारी तसेच महाराष्ट्रातील ढासळलेली कायदा व सुव्यवस्था यांचा निषेध करण्यासाठी हे संघर्ष यात्रा वजा आंदोलने असतील. यात्रेचे आयोजन धुळे लोकसभा युवक काँग्रेस, धुळे शहर युवक काँग्रेस, धुळे ग्रामीण युवक काँग्रेसने केलेले आहे. याच संघर्ष यात्रेचा पहिला टप्पा म्हणून गरताड ते धुळे एस.टी. बसने प्रवास करुन त्यात प्रवास करत असलेले शेतकरी, शेतमजूर, कामगार, युवक, विद्यार्थी, महिला यासह सर्वच घटकांशी चर्चा करुन संघर्षयात्रेची सुरवात करणार आहोत. यासंघर्ष यात्रेत सर्वांनी सामील व्हावे, असे आवाहन युवक काँग्रेसचे सचिव कोठावदे, नीलेश काटे, राजीव पाटील यांनी केले आहे.