धुळ्यात रेडियम दुकानाला आग ; .पाच लाखांचे नुकसान

0

धुळे- शहरातील ऐंशी फुटी रोडवर असलेल्या एका रेडीयमच्या दुकानाला अचानक आग लागल्याने रेडीयमसह फर्निचर आणि अन्य साहित्य जळून खाक झाल्याची घटना शनिवारी पहाटे घडली. रईस अहमद शेख (27) यांच्या मालकीचे रईस रेडीयम नावाचे हे दुकान असल्याचे सांगण्या आले. आग नेमक्या कोणत्या कारणाने लागली, हे समजू शकलेले नाही़ आगीची माहिती महापालिकेच्या अग्नीशमन बंबाला कळताच आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले मात्र तोपर्यंत पाच लाखांचे नुकसान झाले होते.