धुळ्यात सिलिंडर स्फोट ; दोन गंभीर जखमी

0

धुळे – शहरातील चाळीसगाव रोडवरील पवन नगर परीसरातील रहिवासी प्रल्हाद गोस्वामी यांच्या राहत्या घरी शनिवारी सकाळी सिलिंडर स्फोट झाल्याने दोघे गंभीर जखमी झाले. घर क्रमांक 251 मध्ये अनिता गोस्वामी या अंगणात स्वयंपाक करत असताना अचानक घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरचा स्फोट होवून अनिता गोस्वामी व प्रल्हाद गोस्वामी हे गंभीर जखमी झाले असून त्यांना तत्काळ चक्करबर्डी परीसरातील सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.